पाकिस्तानमध्ये स्फोटात 4 सैनिकांसह 6 ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

लाहोर- शहरातील बेदियन रस्त्यावर आज (बुधवार) सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात चार सैनिकांसह सहा जण ठार झाले आहेत, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील बेदियन रस्त्यावर आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चार सैनिक व दोन नागरिकांचा समावेश आहे. या स्फोटात 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आत्मघाती हल्लेखोराने सैनिकांच्या वाहनाला लक्ष्य करून स्फोट घडवून आणला. स्फोटानंतर परिसर ताब्यात घेण्यात आला आहे. स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.