अटलांटा विमानातळावर ताब्यात घेतलेल्या भारतीय नागरिकाचा मृत्यू

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

अमेरिकेच्या इमिग्रेशन डिपार्टमेंटने ताब्यात घेतलेले भारतीय नागरिक अतुलकुमार बाबाभूई पटेल (वय 58) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या इमिग्रेशन डिपार्टमेंटने ताब्यात घेतलेले भारतीय नागरिक अतुलकुमार बाबाभूई पटेल (वय 58) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी पुरेसे कागदपत्रे नसल्याच्या संशयावरून दहा मे रोजी पटेल यांनी अटलांटा येथील विमानतळावरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अटलाटांमधील डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवले होते. तेथे त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याचे समजले. शनिवारी त्यांना तपासण्यासाठी आलेल्या नर्सला पटेल यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याचे समजले. त्यामुळे पटेल यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.

ताब्यात असलेल्या सर्वांचे प्रकृतीची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचा दावा इमिग्रेशन डिपार्टमेंटने केला आहे.