विजय मल्ल्या, सुनील गावसकर यांचा फोटो व्हायरल

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जून 2017

सुनील गावसकरांबरोबरचा मल्ल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 

लंडन - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी कर्जबुडवे विजय मल्ल्या उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व विजय मल्ल्या यांचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून परदेशात पलायन करणाऱ्या विजय मल्ल्यांकडून कर्जवसुलीसाठी बॅंकांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. विजय मल्ल्या लंडनमध्ये असून, त्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेला बळकटी मिळण्यासाठी सक्तवसुली संचालनालय (ईडी) प्रयत्नशील आहे. त्यासाठी आयडीबीआय बॅंकेचे नऊशे कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी "ईडी' जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याची शक्‍यता आहे. त्यापूर्वी मल्ल्या एजबॅस्टन येथील स्टेडियममध्ये भारत-पाक सामन्याचा आनंद घेताला दिसला.

सुनील गावसकरांबरोबरचा मल्ल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
महाराष्ट्र 'बंद' यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'​
भारताचा पाकवर 124 धावांनी दणदणीत विजय​
'दानवेंच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्याचा तपास करा'
मॉन्सूनचे महाराष्ट्रात गुरुवारी आगमन​
मुंबईत भाज्यांच्या किमती भडकल्या