'सार्क' परिषदेवर अफगाणिस्तानचाही बहिष्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

उरीत लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्याचे धोरण आखले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या व्यासपीठावरून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर कडाडून हल्ला केला होता. सिंधू पाणीवाटप करारातील तरतुदीही भारतीय प्रशासन आता तपासून पाहू लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ‘सार्क’च्या परिषदेवर प्रश्‍नचिन्ह होते. 

नवी दिल्ली - इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क‘ परिषदेत भारत, भूतान, बांगलादेशपाठोपाठ आता अफगाणिस्ताननेही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली तीव्र भूमिका कायम राखत भारताने ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकला होता. यात भूतान आणि बांगलादेशनेही बहिष्कार घातला होता. आता अफगाणिस्तानही यात सहभागी झाले आहे. ‘इस्लामाबादमध्ये होणाऱ्या परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत,’ असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. भारताच्या या भूमिकेनंतर बांगलादेशानेही सार्क परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय जाहीर केला. भूताननेही सार्क परिषदेला अर्थ नसल्याचे म्हटले आहे.