ओसामा बिन लादेनचा जुना साथीदार सीरियात ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मसरी याने 1980 व 90 च्या दशकांत अफगाणिस्तानमध्ये अल कायदासाठी "प्रशिक्षण शिबिरे' चालविली होती. त्याच्या मृत्युमुळे अल कायदाचे मोठे नुकसान झाल्याचे मानले जात आहे

वॉशिंग्टन - अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेचा कुख्यात म्होरक्‍या ओसामा बिन लादेन याच्या सहकाऱ्यास या महिन्यात सीरियातील इडलिबनजीक करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांत ठार करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

अबु हानी मसरी असे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो लादेनचा निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. ""इडलिबजवळ गेल्या 3 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या हल्ल्यांत 10 दहशतवादी ठार झाले. यानंतर दुसऱ्याच दिवशी करण्यात आलेल्या हल्ल्यांत मसरी यालाही यमसदनी धाडण्यात आले,'' असे कॅप्टन जेफ डेव्हिस यांनी म्हटले आहे.

मसरी याने 1980 व 90 च्या दशकांत अफगाणिस्तानमध्ये अल कायदासाठी "प्रशिक्षण शिबिरे' चालविली होती. मसरी याच्या मृत्युमुळे अल कायदाचे मोठे नुकसान झाल्याचे मानले जात आहे. मसरी याचा मृत्यु हे अमेरिकेसाठी मोठे यश असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

ग्लोबल

अमेरिकेने खडसावल्यानंतर "ड्रॅगन'कडून जोरदार पाठराखण बीजिंग: दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...

09.33 PM

वॉशिंग्टन : पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला आहे. अमेरिका आता यावर गप्प बसू शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

10.39 AM

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017