अमेरिका निष्पाप नाही : ट्रम्प

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

अमेरिकेकडूनही अनेक चुका झाल्या. त्यांमुळे अनेक जण मृत्युमुखी पडले. तेव्हा जगात अनेक मारेकरी आहेत. आपला देश हा पूर्णत: निष्पाप आहे, असे तुम्हाला वाटते की काय?

वॉशिंग्टन - अमेरिकेने केलेल्या चुकांमुळे जगभरातील अनेक नागरिकांना प्राण गमवावा लागल्याची भावना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे "मारेकरी' असल्याची भूमिका ट्रम्प यांच्यापुढे यावेळी मांडण्यात आली. मात्र पुतीन यांच्यासंदर्भात बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकाही पूर्णत: निर्दोष नसल्याचे प्रतिपादन केले.

"अमेरिकेच्या धोरणांकडेही या दृष्टिकोनामधून पहावयास पाहिजे. मी पहिल्यापासूनच इराकमध्ये अमेरिकेने केलेल्या युद्धाविरोधात होतो. अमेरिकेकडूनही अनेक चुका झाल्या. त्यांमुळे अनेक जण मृत्युमुखी पडले. तेव्हा जगात अनेक मारेकरी आहेत. आपला देश हा पूर्णत: निष्पाप आहे, असे तुम्हाला वाटते की काय?,'' असे ट्रम्प म्हणाले. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेविरुद्धच्या लढाईमध्ये रशियाबरोबर सहकार्य करण्याची इच्छा ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, ट्रम्प यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांनी अमेरिकेची रशियाबरोबर तुलना केल्याने टीकास्त्र सोडले आहे. ""रशियासारख्या हुकूमशाही, हिंसक राजवटीबरोबर अमेरिकेची तुलना करण्यात आलेली तुलना ही सर्वथा अयोग्य व निषेधार्ह आहे. राष्ट्राध्यक्षांच्या या धोकादायक धोरणास विरोध दर्शविणे ही अमेरिकेमधील सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे,'' अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया सिनेटर बेन कार्डिन यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली आहे.

ग्लोबल

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017