अमेरिकन आम्ही येतोय; लादेनच्या मुलाचा इशारा

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

सीबीएस न्यूजवरील कार्यक्रमात सौफान यांनी म्हटले आहे, की हामजा हा अल् कायदाचा लाडका आहे. 'मी पोलादासारखा मजबूत आहे...जिहादचा रस्ता हा अल्लाहचा रस्ता आहे...ज्याच्यासाठी आपण जगतो...', असे हामजाचे पत्र आहे.

अमेरिका सावधान, अल् कायदा पुन्हा येत आहे...

वॉशिंग्टन : ओसामा बिन लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अल् कायदा नव्या ताकदीने येत आहे आणि लादेनचा मुलगा हामजा त्याचे नेतृत्व करीत आहे, असा दावा एफबीआयच्या एका माजी एजंटने केला आहे. पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये लादेनच्या घरावर हल्ला करणाऱया टीममध्ये या एजंटचा सहभाग होता.

या एजंटने लादेनच्या घरातून जप्त केलेली काही पत्रे वाचली आहेत. त्या पत्रांमधील मजकुरावरून एजंटने हा दावा केला आहे. लादेनच्या घरावर हल्ला झाला, तेव्हा हामजा २२ वर्षे वयाचा होता. आज तो २८ वर्षांचा आहे. 

अली सौफान असे एजंटचे नाव आहे. त्याने सीबीएस न्यूज या चॅनेलला दिलेल्या माहितीनुसार, लादेनबद्दल हामजा याला अतिशय आदर आणि प्रेम होते. लादेनची खूनशी प्रवृतीत हामजामध्ये असल्याचे पत्रातील त्याच्या भाषेवरून स्पष्ट दिसते, असे सौफान यांचे म्हणणे आहे. 

सीबीएस न्यूजवरील कार्यक्रमात सौफान यांनी म्हटले आहे, की हामजा हा अल् कायदाचा लाडका आहे. 'मी पोलादासारखा मजबूत आहे...जिहादचा रस्ता हा अल्लाहचा रस्ता आहे...ज्याच्यासाठी आपण जगतो...', असे हामजाचे पत्र आहे.

हामजाला याच वर्षीच्या जानेवारीत अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. लादेनलाही अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हटले होते. 'लादेन जी भाषा वापरत होता, तीच भाषा हामजा वापरत आहे,' असे सौफीन यांनी म्हटले आहे. 

अमेरिकी नौदलाच्या, 'सील'च्या तुकडीने मे २०११ मध्ये अबोटाबादमध्ये लादेनच्या घरावर हल्ला करून त्याला ठार मारले होते. कित्येक महिन्याच्या गोपनिय तयारीनंतर अमेरिकेने अतिशय नियोजनबद्धरित्या हा हल्ला केला होता.

Web Title: Americans, we're coming: Bin Laden's son threatens to avenge father's death