अडीच हजार वर्ष जूने शहर सापडले

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

अथेन्स - ग्रीसमधल्या पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अथेन्सपासून काही किलोमीटर अंतरावर एका शहराचा शोध लागला आहे. गेले अनेक वर्ष याबाबत संशोधन सुरु होते. त्यामुळे हे शहर 'लॉस्ट सीटी' म्हणून ओळखले जात होते. उत्खनना दरम्यान सापडलेले हे शहर अडीच हजार वर्ष जूने असल्याचा अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे.  

संशोधकांच्या टीमचे नेतृत्व करणारे रॉबीन रॉनल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्खनन सुरु असून, या शहराचे क्षेत्रफळ 99 एकरमध्ये पसरलेले असावे. काही मनोरे, भितींचे अवशेष यांचे संशोधन करत असताना येथे शहर असावे असा अंदाज संशोधकांनी बांधला. काही महिन्यांपूर्वी पुरातत्व विभागाला इसवी सन पूर्व ५०० शतकातील जुनी मातीची भांडी आणि काही नाणी देखील या ठिकाणी सापडली होती.

नव्याने शोध लागलेले हे ठिकाण उत्तर अथेन्सपासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे. 

या परिसरात आणखी उत्खनन व्हायचे आहे. त्यामुळे भूतकाळात हरवलेल्या ग्रीसच्या इतिहासाच्या आणखी काही महत्त्वाच्या खुणा येथे सापडण्याची शक्यता आहे.

ग्लोबल

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017