वसीम अक्रम विरोधात अटक वॉरंट जारी

wasim akram
wasim akram

इस्लामाबाद- पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम विरोधात स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.

वसीम अक्रम यांनी 6 ऑगस्ट 2016 रोजी बहादुरबाद पोलिस ठाण्यामध्ये सेवानिवृत्त लष्करी अधिकारी अमीरूर रहमान व अन्य नागरिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी स्थानिक न्यायालयात 31 वेळा सुनावणी झाली. अक्रम यांना अनेकदा सुनावूनही ते न्यायालयात उपस्थित राहिले नव्हते. यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

दरम्यान, कराचीत युवा गोलंदाजांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी अक्रम मैदानावर जात असताना सन 2016 मध्ये त्यांच्या मोटारीवर गोळीबार झाला होता. याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com