नाम यांच्यावरील हल्ल्यासाठी मिळाले होते 90 डॉलर

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

अटक केलेल्या दोन महिलांपैकी एकीने खळबळजनक दावा केला आहे.

क्वालालंपूर : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांचे सावत्र भाऊ किम जोंग नाम यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोन महिलांपैकी एकीने खळबळजनक दावा केला आहे.

नाम यांच्या चेहऱ्यावर फवारा मारण्यासाठी एका व्यक्तीने 90 डॉलर दिले होते आणि हा एक गमतीदार कार्यक्रमाचा भाग असल्याचे वाटल्याने तसे केल्याचे या महिलेने सांगितले आहे.

या रासायनिक फवाऱ्यामध्ये विषाचे प्रमाण असल्याने नाम यांचा मृत्यू झाला होता.

 

Web Title: attackers got 90 dollars to kill kim jong naam