'पीओके'मध्ये शरीफ, पाक सरकारविरोधात निदर्शने

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

पाक सरकार आणि नवाझ शरीफ यांच्याविरोधात यापूर्वीही निदर्शने करण्यात आली आहेत. मात्र, यापुढे दहशतवादी हल्ल्यांना सहन केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पाक सरकारविरोधात आज (रविवार) पाक व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) निदर्शने करण्यात आली. 

पीओकेमधील नेते हयात खान यांनी पाक लष्कर आणि सरकारला इशारा देताना याठिकाणी दहशतवादी पाठविणे बंद करावे, असा इशारा दिला. आता पुरे झाले आहे, आम्ही त्यांना येथून हकलून देऊ, या शब्दात पाक सरकारला सुनाविण्यात आले आहे. पीओकेमधील हजीरा येथे निदर्शने करण्यात आली.

पाक सरकार आणि नवाझ शरीफ यांच्याविरोधात यापूर्वीही निदर्शने करण्यात आली आहेत. मात्र, यापुढे दहशतवादी हल्ल्यांना सहन केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथे नुकताच दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाज्वा यांनी या दहशतवादी हल्ल्यांबद्दल भारताची गुप्तहेर संघटना रॉ ला जबाबदार धरले होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मुंबई: क्रिकेटच्या बॅटने केली भावाची हत्या
बलात्कार पीडित महिलेवर चौथ्यांदा ऍसिड हल्ला
गोमांसावरून हत्येप्रकरणी भाजप नेत्याला अटक​
चंद्रपूर: खासगी बसला अपघात, 20 जण जखमी​
दोनही हातांनी वाजलेली टाळी​
जमावाच्या हल्ल्यांनी राष्ट्रपती चिंतित​
महिला क्रिकेटमध्ये आज भारत-पाक लढत​
जोड नसलेला उदारमतवाद​
#स्पर्धापरीक्षा - गुरुत्वीय लहरीचा संशोधनात्मक प्रयोग​
मोदी-ट्रम्प भेटीचं फलित (श्रीराम पवार)​
शापित देवभूमीला शांततेची आस (किशोर जामकर)​