मोसूलमध्ये इराकी तोफा थंडावल्या 

पीटीआय
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

गोगजाली (इराक) : 'इसिस'कडून मोसूल शहर ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात खराब हवामानामुळे अडथळा येत असून, दृश्‍यमानता कमी होत असल्यामुळे कारवाई काहीशी मंदावली असल्याचे समजते. मात्र, मोसूलच्या पूर्वेकडील सीमेवर इराकच्या सरकारी फौजांनी आपली स्थिती मजबूत केली आहे. 

इराकमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या मोसूलवर ताबा मिळविण्यासाठी इराकच्या लष्कराने मोठी मोहीम उघडली आहे. मागील काही दिवसांपासून या भागात 'इसिस' आणि सरकारी फौजांमध्ये युद्ध सुरू आहे. इराकच्या सरकारी फौजांना अमेरिकी हवाई दलाच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय फौजांचे सहकार्य मिळते आहे. 

इराकच्या लष्कराचे ब्रिगेडियर जनरल हैदर फधिली यांनी सांगितले, की सध्या इराकी फौजांनी पूर्वेकडील सीमेवर आपली स्थिती मजबूत केली आहे. ढगाळ वातावरण आणि दृश्‍यमानता कमी असल्यामुळे लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत. 

मोसूलपासून जवळच असलेल्या गोगजालीमध्ये आज गोळीबार थंडावला असल्याचे सांगण्यात आले. इराकी लष्कराकडून इसिसच्या काही ठिकाणांवर तोफगोळ्यांच्या मारा करण्यात येत आहे. मोसूलमध्ये काही प्रमाणात प्रवेश करण्यात यशस्वी झाल्यानंतर आज प्रथमच धुमश्‍चक्री थंडावली असल्याचे सांगण्यात आले. दोन वर्षांत प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे. मोसूल शहरात सुमारे दहा लाख सामान्य नागरिक असून, त्यांना कुठलीही इजा पोचू न देता संपूर्ण शहरातून 'इसिस'ला हुसकावण्याचे इराकच्या लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. मोसूल हा 'इसिस'चा सर्वांत मोठा आणि इराकमधील अखेरचा बालेकिल्ला मानला जातो. 

'इसिस'चा बालेकिल्ला 

  • सामरिकदृष्ट्या मोसूल शहराला महत्त्वाचे स्थान 
  • इराकमधील दुसरे सर्वांत मोठे शहर 
  • 'इसिस'चा इराकमधील अखेरचा बालेकिल्ला 
  • स्थानिक कुर्दीश बंडखोरांची इराकी लष्कराला साथ