'लष्कर ए तैयबा'च्या विद्यार्थी शाखेवर बंदी

पीटीआय
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

वॉशिंग्टन - भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत सहभागी असलेली पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाची विद्यार्थी संघटना "अल मोहंमदिया स्टुडंट्‌स'ला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्याचबरोबर या संघटनेतील दोन वरिष्ठ नेत्यांना काळ्या यादीत घातले आहे. या कारवाईने अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या म्होरक्‍यांना झटका दिला आहे.

वॉशिंग्टन - भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत सहभागी असलेली पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाची विद्यार्थी संघटना "अल मोहंमदिया स्टुडंट्‌स'ला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्याचबरोबर या संघटनेतील दोन वरिष्ठ नेत्यांना काळ्या यादीत घातले आहे. या कारवाईने अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या म्होरक्‍यांना झटका दिला आहे.

अल मोहंमदिया स्टुडंट्‌स संघटनेचे दोन वरिष्ठ नेते मोहंमद सरवर आणि शाहिद मेहमूद यांच्यावर बंदी घालत "मोस्ट वॉंटेड' म्हणून घोषित केले. हे दोघेही पाकिस्तानात राहतात. लष्कर ए तैयबाला अमेरिकेने अगोदरच 2001 मध्ये दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले, की लष्कर ए तैयबाने अनेकदा नाव बदलले आणि काळ्या यादीतून बचाव करण्यासाठी नवनवीन संघटना उभारल्या. याच पद्धतीने अल मोहंमदिया स्टुडंट्‌स स्थापन झाली असून, ती दहशतवादी कारवायांत सक्रिय असल्याचे म्हटले आहे. 2009 मध्ये स्थापना झाल्यानंतर लष्कर ए तैयबाची मोहंमदिया स्टुडंट्‌स ही सहकारी संघटना म्हणून काम करत आहे. लष्कर ए तैयबाच्या मोठ्या नेत्यांसमवेत काम करत युवकांची भरती करणे आणि अन्य कारवायांत सहभाग घेणे, हे प्रमुख काम या संघटनेचे होते.

'लष्कर'चे जाळे उद्‌ध्वस्त होणार
मोहंमद सरवर आणि शाहिद मेहमूद हे दोघे लष्कर ए तैयबाच्या दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करत होते. देणगीस्वरूपात जमा केलेला पैसा हे संघटनेच्या म्होरक्‍यांपर्यंत पोचवत. अमेरिकेने म्हटले, की या कारवाईचा उद्देश केवळ लष्कर ए तैयबाच्या कारवाया जगासमोर आणणे एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता, तर आर्थिक जाळेही मोडून काढणे हा होता. सरवर हा गेल्या दहा वर्षांपासून लष्कर ए तैयबाचा वरिष्ठ अधिकारी होता आणि अनेक घातपाती कारवायांत त्याचा महत्त्वाचा सहभाग होता.

ग्लोबल

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017