बांगलादेशात एका भारतीय विद्यार्थ्याला भोसकले

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

ढाका  सहकाऱ्यासोबत झालेल्या वादातून एका भारतीय विद्यार्थ्याला चाकूने भोसकल्याची घटना चित्तागोंग शहरात घडली.

अतिफ शेख असे विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अतिफ हा अकबर शाह परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये विन्सन मैसनम सिंह याच्यासोबत राहात होता. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर विन्सनने अतिफला चाकूने भोसकले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, विन्सनने या प्रकारानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तपासात समोर आली असून, या दोघांनी मद्यपान केल्याचे वृत्तही काही माध्यमांनी दिले आहे.

टॅग्स