भारतासोबत संबंध जोपासण्यात अमेरिकेचा लाभ- ओबामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

वॉशिंग्टन- आपल्या आठ वर्षांच्या कार्यकालामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत-अमेरिका संबंध सुधारण्यासाठी "सखोल" गुंतवणूक केली आहे. त्यामध्ये राजनैतिक आणि आर्थिक असा मोठा लाभ आहे, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. 

"राष्ट्रीय सुरक्षा, राजनैतिक आणि आर्थिक आघाडीवर मोठा फायदा होईल असा विश्वास अध्यक्ष ओबामा यांना असल्याने त्यांनी जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतासोबतच्या संबंधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे," असे व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

भारत-अमेरिका संबंधांबाबत नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय करावे असे ओबामा यांना वाटते, असा प्रश्न विचारल्यावर जोश अर्नेस्ट यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.  
"त्यामुळे येणारे नवे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांविषयीच्या त्यांच्या कल्पना अद्याप मांडल्याचे ऐकिवात नाही, मात्र ओबामा यांना हे संबंध निश्चितपणे गुंतवणुकीसाठी योग्य वाटतात आणि  अमेरिकेची आर्थिक ताकद व जगातील प्रभाव वाढविण्याकरीता भारताशी संबंध दृढ करण्यासाठी ते निश्चितपणे सकारात्मक आहेत," असे अर्नेस्ट यांनी सांगितले.
 
ग्लोबल

जेद्दाह - सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दाह येथील रस्त्यावर एका लोकप्रिय...

01.36 PM

लंडन : भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्तांना ब्रिटिश सरकारने आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे....

10.42 AM

अमेरिकेने खडसावल्यानंतर "ड्रॅगन'कडून जोरदार पाठराखण बीजिंग: दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017