पाचूच्या ब्रेसलेटची तिने चुकवली 'किंमत'

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

चुकून तुटल्याने 28 लाखांची भरपाई देण्याची वेळ

बीजिंग: दुकानांमध्ये "वस्तू काळजीपूर्वक हाताळा. मोडतोड झाल्यास भरपाई द्यावी लागेल,' अशी सूचना अनेकदा आपण वाचतो आणि ती फारशी गांभीर्याने घेतही नाही. मात्र, असे करणे चीनमधील एका महिला ग्राहकाला चांगलेच महागात पडले आणि त्याची "किंमत' लाखो रुपयांत चुकविण्याची वेळ आली.

युनान प्रांतातील एका सराफा दुकानात ही महिला दागिने खरेदी करण्यासाठी गेली होती. त्या वेळी पाचूचे रत्नजडीत ब्रेसलेट हातात घालून पाहताना तिने त्याची किंमत विचारली. 44 हजार डॉलर (28 लाख 36 हजार 460 रुपये) एवढा आकडा ऐकून ती अवाक झाली. त्यानंतर ब्रेसलेट हातातून घाईघाईने काढताना जमिनीवर पडून तुटले. हे पैसे आपल्याला द्यावे लागणार या धक्‍क्‍याने ती बेशुद्ध पडली, असे वृत्त "डेली मेल'ने दिले आहे. महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिची प्रकृती सुधारली असल्याचे दुकानमालक लिन वुई यांनी सांगितले. मात्र, महिलेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मालकांनी किंमतीत तडजोड करण्यास मान्यता दिली. शेवटी 70 हजार युआन (6,65,672 रुपये) देण्याची तयारी तिच्या कुटंबाने दाखविली. या घटनेवर इंटरनेटवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी दागिन्यांची किंमत फसवी असल्याचे सांगून त्या किमतीयोग्य ब्रेसलेट नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स