पाकला दहशतवादी घोषित करण्यासाठी विधेयक

वृत्तसंस्था
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

न्यूयॉर्क - पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्यासाठी अमेरिकी काँग्रेसने विधेयक आणले आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे नाव न घेता छुपे युद्ध न रोखल्यास दहशतवाद देश भस्मसात करून टाकेल, असा इशारा दिला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघात आज (बुधवार) पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाषण होणार आहे. या भाषणात ते काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच ओबामा यांनी पाकिस्तानला दहशतवादाबाबत इशारा दिला आहे. अमेरिकी काँग्रेसने पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी विधेयक आणले आहे. या विधेयकामुळे पाकिस्तान दहशतवादाचे समर्थन करतेय की नाही, हे पाहता येणार आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या अखेरच्या भाषणात ओबामा म्हणाले की, दहशतवादी आणि सांप्रदायिक हिंसेमुळे पश्चिम अशियातील वातावरण अस्थिर झाले आहे. आम्ही दहशतवादाची पाळएमुळे खाणण्यास सुरवात केली आहे. काही देशांनी छुपे युद्ध न थांबविल्यास दहशतवाद त्यांनाच भस्मसात करुन टाकेल आणि त्याचा फटका इतर देशांनाही बसेल.