'बुकर' विजेते लेखक जॉन बर्जर यांचे निधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

लंडन- कलात्मक समीक्षेची परंपरा सुरू करणारे बुकर पुरस्कार विजेते कांदबरीकार जॉन बर्जर यांचे नुकतेच निधन झाले. 

बर्जर 90 वर्षांचे होते. पॅरीसमधील अँटनी भागातील राहत्या घरी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. मागील वर्षभरापासून ते आजारी होते, अशी माहिती द टिलिग्राफने दिली आहे. 

मार्क्सवादी मर्मज्ञ म्हणून ओळखले जाणारे बर्जर यांच्या 'वेज ऑफ सीईंग' या 'बीबीसी'वरील मालिकेतून कलात्मक समीक्षेमध्ये एक राजकीय दृष्टीकोन आणला. 
G हे एकाक्षरी शीर्षक असलेल्या कादंबरीसाठी त्यांना 1972 मध्ये मॅन बुकर पुरस्कार मिळाला होता. पुरस्काराच्या रकमेपैकी अर्धे मानधन 'द ब्लॅक पँथर्स' या आफ्रिकन-अमेरिकन चळवळीसाठी त्यांनी दिले. 

उत्तर लंडनमधील हॅकनी येथे जन्म झालेल्या बर्जर यांनी चित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांची चित्रकला 1940 मध्ये प्रदर्शनातून मांडल्यानंतर त्यांनी लेखनामध्ये नशीब अजमावले. कवितांपासून ते पटकथांपर्यंत, तसेच छायाचित्रणाविषयी, स्थलांतरित कामगारांचे शोषण, पॅलेस्टिनींचा संघर्ष अशा विविध विषयांवर, वेगवेगळ्या स्वरुपात त्यांनी लेखन केले. 
 
Web Title: Booker prize-winning author John Berger dead at 90