ब्रिटनच्या संसदेत 'ब्रेक्‍झिट’ विधेयक मंजूर

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

शेअर बाजार आणि आर्थिक घडामोडींची अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या खास अर्थ विषयक www.sakalmoney.com या संकेतस्थळाला भेट द्या.

लंडन : ब्रिटनच्या संसदेत आज 'ब्रेक्‍झिट विधेयक' मंजूर झाले असून, यामुळे पंतप्रधान थेरेसा मे यांची युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठीची अधिकृत चर्चा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बदलाची कोणतीही शिफारस मान्य न करता हे विधेयक 274 विरुद्ध 118 मतांनी मंजूर करण्यात आले. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

युरोपीय महासंघाच्या लिस्बन करारातील 50 व्या कलमानुसार, थेरेसा मे या आता कोणत्याही क्षणी महासंघातून बाहेर पडण्याबाबत चर्चा करून प्रक्रिया सुरू करू शकतात. मात्र, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या महिनाअखेरीपर्यंत त्या चर्चा सुरू करणार नाहीत.

 

Web Title: brexit bill passed in british parliament