ब्रिक्स : भारतात जहालवादाविरोधात परिषद घेण्याचा मोदींचा पस्ताव

वृत्तसंस्था
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

दहशतवादाच्या मुद्द्यावर चीन पाकिस्तानला साथ देत आहे. या बैठकीत भारताने पाकिस्तानला लक्ष्य करू नये असे चीनच्या शी जीनपिंग यांनी भारताला ब्रिक्स परिषदेपूर्वी सांगितले आहे.

बीजिंग : आपल्या देशांतील आपल्या नेत्यांनी ब्रिक्सच्या निर्मितीसाठी योगदान दिले आहे. त्यामुळे परिवर्तन सुरू झाले आणि जगाचा वृद्धीदर वाढला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच, भारतात जहालवादाविरोधात परिषद घेण्याची कल्पना मोदी यांनी यावेळी ब्रिक्स सदस्य देशांसमोर मांडली. 

तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सुधारणांवर मोदी यांनी यावेळी चर्चा केली. ब्रिक्समधील नेत्यांनी शियामेन जाहीरनामा स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्ससाठी पुढील दहा वर्षांसाठीची ब्लू प्रिंट दिली. 

ब्रिक्स परिषदेसाठी चीनमधील शियामेन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. काल रात्री त्यांनी तिथल्या भारतीयांशी संवादही साधला. मोदींच्या आगमनानंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणा घुमल्या. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज मोदींचं शियामेन शहरात स्वागत केलं. इथेच ब्रिक्स परिषद होते आहे. 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान मोदी चीन दौऱ्यावर आहेत.

त्यामुळे उत्तर कोरियाने नुकत्याच घेतलेल्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीवर ब्रिक्स परिषदेत काय चर्चा होते याकडे लक्ष लागून राहिले आहे. तसेच, डोकलाम येथील सीमावादावरून अलीकडेच भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाल्याने दोन्ही देशांसाठी ही परिषद महत्त्वाची आहे.

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांची यावेळी भेट झाली. त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पूर्व आशियाई आर्थिक आघाडीमध्ये सहभागी झाल्याबद्दल पुतीन यांनी मोदींचे आभार मानले. यावेळी आर्थिक संबंध, तेल आणि वायू क्षेत्रातील सहकार्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

 

ग्लोबल

नॅपिडॉ : लष्कराबाबत सौम्य धोरण अवलंबिले असल्याचा आरोप म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांनी फेटाळून लावला....

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नोकऱ्यांबाबत काँग्रेस ठरलेले अपयशी, मोदी तर निष्क्रिय: राहुल गांधी न्यूयॉर्क : असहिष्णुता आणि बेरोजगारी ही सध्या भारताच्या...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला असून, यामध्ये सुमारे दीडशे लोक...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017