वणीचा मृत्यू काश्मीरचा 'टर्निंग पॉइंट'- सरताज अझीझ

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

इस्लामाबाद- 'हिजबुल'चा म्होरक्या बुऱ्हान वणी याचा मृत्यू ही काश्मीरसाठी कलाटणी देणारी घटना आहे. त्यानंतर काश्मीरमध्ये झालेला हिंसचार म्हणजे तेथील तरुणांचीच चळवळ आहे आणि तो भारताच्या चुकीच्या कृतीचा परिणाम आहे, असा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र संबंध सल्लागार सरताज अझीझ यांनी केला. 

काश्मीर एकता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अझीझ यांनी यांनी वरील विधान केले. 
भारतीय फौजांनी बुऱ्हान वणी याला 8 जुलै 2016 रोजी मारल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेकांचे मृत्यू झाले. त्यापैकी अनेक जाहीर करण्यात आले नाहीत. 

अझीझ म्हणाले, "मागील सात महिन्यांपासून हा हिंसाचार सुरू आहे. मात्र, त्यामुळे आपले हक्क अबाधित राखण्याचा काश्मिरी युवकांचा स्व-निश्चयाच्या निर्णयावर परिणाम झालेला नाही."