श्रीलंकेमध्ये मंत्रिमंडळ बदल

पीटीआय
मंगळवार, 23 मे 2017

अंतर्गत यादवीच्या काळात झालेल्या युद्ध गुन्ह्यांबद्दल शक्‍य असलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध टाळण्यात महत्त्वाचा वाटा असलेले परराष्ट्र मंत्री मंगला समरवीरा यांना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून अर्थमंत्री रवी करुणानायके यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे.

कोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सीरिसेना यांनी आपला पहिला मंत्रिमंडळ बदल केला असून परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री यांची खाती परपस्परांमध्ये बदलली आहेत.

अंतर्गत यादवीच्या काळात झालेल्या युद्ध गुन्ह्यांबद्दल शक्‍य असलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध टाळण्यात महत्त्वाचा वाटा असलेले परराष्ट्र मंत्री मंगला समरवीरा यांना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून अर्थमंत्री रवी करुणानायके यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे.

यादवीदरम्यान मानवी हक्क भंगाप्रकरणी आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना तपासणीची परवानगी दिल्याबद्दल समरवीरा यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती.