पाकिस्तानात 19 वर्षांनंतर जनगणना

पीटीआय
सोमवार, 13 मार्च 2017

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये 1998 नंतर तब्बल 19 वर्षांनी जनगणना होणार आहे.या जनगणनेसाठी पाकिस्तान लष्कराची मदत घेण्यात येणार आहे.बुधवारी(15 मार्च) पासुन या जनगणनेला सुरुवात होणार असल्याची माहीती पाकिस्तान लष्करातील अधिकारी मेजर जनरल आसिफ गफुर व पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री मरिअम औरंगजेब यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.

25 मे पर्यंत दोन टप्प्यांमध्ये हि जनगणना पुर्ण केली जाणार असुन त्यासाठी 1850 कोटी रुपये खर्च येणार आहे.जवळपास दोन लाख पाकिस्तानी सैनिकांची मदत यावेळी घेतली जाणार आहे.जनगणने दरम्यान घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाच्या माहीतीची नोंद घेणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत किमान एक सैनिक असणार आहे.कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असणारे हे सैनिक त्यांना माहीती गोळा करण्यासाठी मदतही करणार आहेत.

जनगणनेसाठी प्रशासनातर्फे आणि लष्करातर्फे पुर्ण तयारी करण्यात आल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.या जनगणनेसाठी पाकिस्तान सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील जवळपास एक लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जनगणनेमध्ये चुकीची माहिती देणाऱ्यास पन्नास हजार रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणार आहे.