चीन घेणार 68 लाख कोटींची विमाने

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 सप्टेंबर 2016

सध्याच्या अस्थिर वातावरणातसुद्धा गुंतवणुकीची संधी देणाऱ्या तीन क्‍लोज एंडेड योजना सध्या बाजारात मर्यादित काळाकरिता उपलब्ध आहेत. शेअर बाजाराने गेल्या काही महिन्यांत उसळी मारली असली, तरी अजूनही गुंतवणूक केल्यास चांगला परतावा (पुढील तीन वर्षांमध्ये) मिळण्याची शक्‍यता असलेल्या निवडक कंपन्यांमध्ये या योजना गुंतवणूक करणार आहेत. तज्ज्ञांच्या मते आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग यापुढे कुठलेही सरकार आले तरीही वाढणारच आहे. 
तसेच, आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार निवडणुकीनंतर दोन वर्षांमध्ये शेअर बाजाराने चांगला परतावा दिलेला आहे. त्यामुळे सेन्सेक्‍सकडे लक्ष न देता ज्या चांगल्या कंपन्या सध्या आकर्षक मूल्यांकनाला उपलब्ध आहेत, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या या तीन योजनांचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा. 
मोठ्या कंपन्यांच्या तुलनेमध्ये मध्यम आणि लहान कंपन्यांचे मूल्यांकन अधिक आकर्षक आहे, असे फंड व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. 

बीजिंग : चीनमधील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार वाढत असून, चीनमधील विमान प्रवासी कंपन्या पुढील 20 वर्षांत बोइंगकडून 1.025 ट्रिलियन डॉलरची (सुमारे 68 लाख कोटी रुपये) विमाने खरेदी करणार आहेत.

चीनमधील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राची वाढ होत आहे. 2035 पर्यंत सुमारे 6 हजार 810 बोइंग विमानांची मागणी चीनमधून नोंदविली जाईल. आधीच्या 2034 पर्यंतच्या अंदाजात आणखी 7.6 टक्के वाढ झाली आहे. चीनमधून विमानांची मागणी वाढणार असली तरी अमेरिकी कंपन्यांकडून मागणी घटू लागली आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती याला कारणीभूत ठरली आहे. यामुळे अमेरिकी कंपन्या चिंतित आहेत. बोइंग आणि तिची युरोपमधील प्रतिस्पर्धी एअरबस चीनमधील बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. चीनचे नागरी हवाई क्षेत्र सर्वाधिक वेगाने वाढत आहे. यामुळे कंपन्या येथे उत्पादन प्रकल्प उभारत आहेत. बोइंगने दिलेल्या माहितीनुसार चीनमधील 50 टक्के व्यावसायिक विमाने त्यांच्या कंपनीची आहेत.

विमान निर्मितीत चीनचा शिरकाव 

चीन स्वतः विमाननिर्मिती करण्याची क्षमता विकसित करण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. चीनचे प्रलंबित "सी919‘ हे विमान या वर्षीच्या अखेर पहिले उड्डाण करणार आहे. "सी919‘ ची स्पर्धा "बोइंग737‘ आणि "एअरबस ए320‘ या विमानांशी असेल. 

चीनमधील मध्यम वर्गाचा विस्तार वाढत असून, नव्या व्हिसा धोरणामुळे हवाई क्षेत्राची वाढ होणार आहे. चीनमधील हवाई प्रवाशांची संख्या पुढील 20 वर्षांत 6.4 टक्के वाढ दरवर्षी होईल. 

रॅंडी टिन्सेथ, उपाध्यक्ष, व्यावसायिक विमान विभाग, बोइंग

Web Title: China