हेलिकॉप्टर घुसखोरीचे चीनकडून समर्थन

पीटीआय
मंगळवार, 6 जून 2017

बीजिंग - चीनने पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)ने एका हेलिकॉप्टर भारतातील हद्दीत झालेल्या घुसखोरीचे समर्थन केले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनयिंग यांनी घुसखोरीबाबत म्हटले की, उत्तराखंडच्या चमौली जिल्ह्यात पीएलएच्या हेलिकॉप्टरचा वावर हा नियमित गस्तीचा भाग आहे. भारत आणि चीनदरम्यान पूर्व सीमेबाबत वाद असल्याचे चीनचे म्हणणे आहे. याठिकाणी चिनी सैनिक या भागात नियमितपणे गस्त घालतात, असे प्रवक्‍त्याने सांगितले.

पीएलएचे दोन हेलिकॉप्टर चमौली जिल्ह्यातील बारहोतीत शनिवारी आले होते. चीनच्या हेलिकॉप्टरने भारतीय हद्दीत येण्याची ही मार्चनंतर चौथी घटना आहे. अधिकारी सूत्रानुसार हे दोन हेलिकॉप्टर पाच मिनिटांनंतर आपल्या हद्दीत परत गेले.

अधिकाऱ्यांच्या मते, चीन सैनिकांचे भारतीय सैनिकांचे फोटोग्राफी करणारे टेहळणी अभियानदेखील असू शकते. या घुसखोरीची दखल घेऊन याची भारतीय हवाई दलाने चौकशी सुरू केली आहे. गेल्या वेळी चीन सैनिकांचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत सुमारे चार किलोमीटर आत आले होते. उत्तराखंडच्या बारहोती सीमा चौकी ही या भागातील तीन चौक्‍यांपैकी एक आहे. याठिकाणी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले आहेत.