मसूद अजहरप्रकरणी चीनचा आडमुठेपणा कायम...

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

बीजिंग - जैश इ मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अजहर याच्यावर राष्ट्रसंघाच्या माध्यमामधून बंदी आणण्यासंदर्भातील प्रस्ताव आणखी एकदा संमत होऊ न देण्याचे संकेत चीनकडून देण्यात आले आहेत. अजहर याच्यावर बंदी आणण्यासाठी "सबळ पुरावा' नसल्याचे टुमणे चीनकडून लावण्यात आले आहे.

"यासंदर्भात आमची भूमिका आम्ही याआधीही अनेक वेळा स्पष्ट केली आहे. या प्रकरणी वस्तुनिष्ठता, व्यावसायिकता व न्याय या मूल्यांचा आदर केला जावा, असे आम्हाला वाटते. सध्या या प्रकरणी काही देशांची भूमिका वेगळी आहे,'' असे चिनी परराष्ट्र मंत्रालयामधील प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले.

याआधी, गेल्या वर्षी अजहर याला राष्ट्रसंघातर्फे दहशतवादी घोषित करण्यासंदर्भात अमेरिका व इतर देशांनी मांडलेला प्रस्ताव चीनकडून "तांत्रिक कारणां'स्तव रोखण्यात आला होता.