कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी येत्या काही दिवसांत युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचे
oil
oilsakal

न्यूयॉर्क: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य स्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. मंगळवारी दुपारी आशियातील बाजारात अमेरिकी कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरल ३.७२ टक्क्यांनी वाढून ९४.४६ डॉलरपर्यंत गेली. ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत २.४६ टक्क्यांनी वाढून ९७.७३ डॉलरवर गेली.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी येत्या काही दिवसांत युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शुक्रवारी केले. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्या. या दराने अलीकडेच ९० डॉलरचा टप्पा पार केला होता. या वर्षातील वाढीची टक्केवारी २० झाली होती. २०२१च्या प्रारंभापासून त्यात ८० टक्के वाढ झाली आहे. अर्थात अपुरा पुरवठा हे याचे एक कारण आहे.

oil
पुतीन यांनी युक्रेनचे तुकडे केल्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रीया

११० डॉलरपर्यंत वाढणार

लिपो ऑईल असोसिएट््सचे अध्यक्ष अँडी लिपो यांनी सांगितले की, रशिया-युक्रेन पेच चिघळल्यास प्रती बॅरल किंमत ११० डॉलरपर्यंत वाढू शकेल. रशिया युरोपला रोज ३० लाख पिंप कच्चे तेल पुरविते. यात प्रतिबॅरल १० ते १५ डॉलरनी वाढ होऊ शकते. रशियन सैन्य युक्रेनचा रीतसर ताबा घेईल अशीच बाजाराची अपेक्षा असेल. त्यानंतर पुरवठा कुठून पुन्हा सुरु होतो याची प्रतिक्षा असेल.

आखाताकडे आशेची नजर

लिपो यांनी सांगितले की जागतिक बाजाराला सद्यःस्थितीत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कुवेत यांच्याकडून आशा असेल. त्यांनी राखीव साठा खुला करावा, जो प्रतिदिन ३५ ते ४० लाख डॉलर इतका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com