'प्रिय मोदी, काश्‍मीरी जनतेचा आवाज ऐका!'

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 ऑगस्ट 2016

श्रीनगर - ‘प्रिय मोदी, जर आपल्याला काश्‍मीरी जनतेची काळजी असेल तर आपण त्यांची संवादाची माध्यमे बंद करून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपण सर्व माध्यमे उघडी ठेवायला हवीत‘, असा शब्दांत एका किशोरवयीन अनिवासी भारतीय मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या भावना कळविल्या आहेत. 

मूळ काश्‍मीरमधील पण सध्या अमेरिकेतील जॉर्जिया येथे वास्तव्यास असलेल्या फातिमा शाहीम या सतरा वर्षांच्या मुलीने मोदींना पत्र लिहिले आहे. तिने पत्रात पुढे म्हटले आहे की, "प्रत्येकाला काश्‍मीर हवा आहे. मात्र काश्‍मीरमधील जनतेची कोणीही काळजी घेत नाहीत. कारण आपण बुऱ्हाण वनी हा दहशतवादी होता की हुतात्मा याबद्दल जनतेचे मत ऐकून घेत नाहीत. तेथील विद्यार्थी लेखनीऐवजी हातात बंदूक का घेत आहेत हे आपण समजून घ्यायला हवे.‘ 

फातिमाने पत्रात लिहिले आहे की तिने 10 जुलै रोजी काश्‍मीरला नातेवाईकांना भेट घेण्यासाठी भेट दिली. "मा. पंतप्रधान, मी फ्रान्स आणि तुर्कीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच्या बातम्या ऐकल्या. दक्षिण भारतातील मॉन्सून बातम्या ऐकल्या.‘ असे म्हणत फातिमाने "पण काश्‍मीरची बातमी कोठे आहे? सर, गेल्या काही दिवसांपासून माझ्या गावी काय चालले आहे हे मला का समजत नाही?‘ असा प्रश्‍नही तिने उपस्थित केला आहे.

ग्लोबल

लष्कर गाह - शहरातील न्यू काबूल बॅंकेबाहेर घडवून आणलेल्या एका कार बॉंबस्फोटात 29...

गुरुवार, 22 जून 2017

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून चिनी नागरिकांना पाकमध्ये येण्यासाठी येणाऱ्या दिल्या...

गुरुवार, 22 जून 2017

लंडन - ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडन शहरामधील अंतर्गत वाहतूक व्यवस्था...

गुरुवार, 22 जून 2017