हैतीत चक्रीवादळाचे थैमान; 842 पेक्षा अधिक मृत्यु

वृत्तसंस्था
शनिवार, 8 ऑक्टोबर 2016

मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. वादळाच्या तीव्रतेमुळे प्रशासनाचा दुर्गम भागाशी संपर्क तुटला असून त्यामुळे तेथील हानीची माहितीही उपलब्ध झालेली नाही.

हैती - उत्तर अमेरिकेतील कॅरेबियन बेटावरील सर्वांत गरीब देश असलेल्या हैतीमध्ये मॅथ्यू चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला असून शुक्रवारपर्यंत त्यामध्ये 842 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे. 

मॅथ्यू चक्रीवादळ शुक्रवारी अमेरिकेच्या फ्लोरिडा किनारपट्टीला धडकले. त्यामुळे तेथे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यापूर्वी चक्रीवादळाचे हैतीत थैमान घातले. आतापर्यंत मृतांची संख्या 842 पेक्षा अधिक झाली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. वादळाच्या तीव्रतेमुळे प्रशासनाचा दुर्गम भागाशी संपर्क तुटला असून त्यामुळे तेथील हानीची माहितीही उपलब्ध झालेली नाही.

या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपत्कालिन बैठक घेतली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ओबामा यांनी "वादळाची तीव्रता खूप मोठी असून त्यामध्ये जीवित आणि वित्तहानी झाली आहे‘ अशी माहिती दिली.