ताबा रेषेवर परिणाम करणारी कृती नको - चीन

पीटीआय
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

चीनचे भारताला आवाहन, घुसखोरी झाल्याचा इन्कार
बीजिंग - लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत चिनी सैन्याने कालव्याचे काम थांबविल्याच्या वृत्ताचा चीन सरकारने आज इन्कार केला आहे. तसेच, ताबा रेषेवर परिणाम होईल अशी एकतर्फी कृती कोणत्याही देशाने करू नये, असेही चीनने या वेळी म्हटले आहे.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी बुधवारी (ता.2) लडाख भागात प्रवेश करत येथे "मनरेगा' योजनेअंतर्गत सुरू असलेले कालव्याचे काम थांबविल्यानंतर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये वाद निर्माण झाला होता.

याबाबत पत्रकारांशी बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनिंग यांनी चिनी सैन्याने ताबा रेषा ओलांडल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा केला. ते म्हणाले,""चीनचे सैन्य चिनी भागातच कार्यरत होते. भारत-चीनदरम्यानची सीमा अद्यापही निश्‍चित झाली नसली तरी दोन देशांनी अनेक करार आणि भेटींनंतर या भागात शांतता कायम ठेवण्याचे मान्य केले आहे. मात्र, या मुद्यावरून भारतीय माध्यमांनी वाद निर्माण केला आहे. ताबा रेषेची स्थिती कोणाच्याही एकतर्फी कृतीने बदलू नये, याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.'' भारत आणि चीनमध्ये अनेक पातळ्यांवर योग्य प्रकारे संवाद सुरू असून, याद्वारेच सध्याचा संभ्रम दूर होईल, असा विश्‍वास चुनिंग यांनी व्यक्त केला.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दोन दिवसांपूर्वी चीनचे 55 सैनिक लडाखच्या डेमचॉक भागात घुसले आणि त्यांनी आक्रमकपणे कालव्याचे काम थांबविले. त्यांच्या या कृतीनंतर लष्कर आणि भारत-तिबेट पोलिस दलाच्या जवानांनी तातडीने तेथे धाव घेत चिनी सैन्याची अरेरावी थांबविली. येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची लांबी 3,488 किमी आहे.

Web Title: Do not act that results in the control line