माध्यमे अमेरिकन नागरिकांचे शत्रू - ट्रम्प

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

द फेक न्यूज मिडीया (न्यूयॉर्क टाईम्स, सीएनएन, एनबीसी, एबीसी, सीबीएस) हे फक्त माझेच नाही, तर अमेरिकन नागरिकांचा शत्रू आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा माध्यमांना लक्ष्य करताना, माध्यमे ही अमेरिकन नागरिकांची शत्रू असल्याचे ट्विट केले आहे.

ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रशासनामध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याच्या बातम्या देणारी माध्यमे 'अप्रामाणिक' असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज (शनिवार) ट्विट करताना पुन्हा एकदा माध्यमांना लक्ष्य बनविले. ट्रम्प यांनी फ्लोरिया येथे गेल्यानंतर लगेच माध्यमांना लक्ष्य बनविले. 

ट्रम्प यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, की द फेक न्यूज मिडीया (न्यूयॉर्क टाईम्स, सीएनएन, एनबीसी, एबीसी, सीबीएस) हे फक्त माझेच नाही, तर अमेरिकन नागरिकांचा शत्रू आहे. आमच्या कारभारावर खूप नागरिक खूष आहेत. सर्व प्रशासन अत्यंत सुरळीतपणे कामकाज करत आहे. काही अप्रामाणिक माध्यमे मात्र चुकीचे चित्र दाखवित आहेत, असे ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटले होते.

Web Title: Donald Trump calls media enemy of the American people