डोनाल्ड ट्रम्प करबुडवे 

डोनाल्ड ट्रम्प करबुडवे 

वॉशिंग्टन (पीटीआय) : करचुकवेगिरीच्या प्रकरणात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या "द न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्राने केला आहे. आपण स्वकष्टाने अब्जाधीश बनल्याचा दावा करत अध्यक्षपदावर आलेल्या ट्रम्प यांनी करचुकवेगिरी करण्यासाठी आपले वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक फ्रेड सी. ट्रम्प यांना मदत केल्याचे गोपनीय कागदपत्रांमधून समोर आले असल्याचे वृत्तात म्हटले आहे. 

मी स्वकष्टाने मोठा झालो असून, माझ्या पालकांकडून मला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसल्याचा ट्रम्प यांनी केलेला दावा ही खोटा आहे. कारण करचुकवेगिरीसाठी मदत केल्याबद्दल त्यांच्या वडिलांकडून ट्रम्प यांना कमीतकमी 413 दशलक्ष डॉलर एवढी प्रचंड रक्कम मिळाली होती, असे "द न्यूयॉर्क टाइम्स'ने म्हटले आहे. 

मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी करण्यासाठी ट्रम्प आणि त्यांच्या भावंडांना पालकांकडून लाखो डॉलरची रक्कम भेट देण्यात आली. या रकमेतूनच ट्रम्प आणि त्यांच्या भावंडांनी बनावट कंपन्या स्थापन केल्याचा खळबळजनक आरोपही या वृत्तात करण्यात आला आहे. या रकमेतील जवळजवळ सर्वच पैसा हा ट्रम्प यांना मिळाला होता, असेही म्हटले आहे. आपल्या आणि भावंडांच्या नावावर मोठ्या प्रमाणात रक्कम वळवून डोनाल्ड ट्रम्प यांनी करचुकवेगिरी करण्यासाठी वडिलांना मदत केल्याचे पुरावे मिळाले असल्याचा दावाही या वर्तमानपत्राने केला आहे. 

करपरतावा आणि आर्थिकबाबींशी संबंधित गोपनीय कागदपत्रांच्या अभ्यासातून ही माहिती मिळाली असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. अध्यक्षपदी आल्यानंतर ट्रम्प यांच्यावर झालेला हा सर्वांत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. 

"व्हाइट हाउस' संतप्त 
ट्रम्प यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाल्यानंतर व्हाइट हाउसकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेले वृत्त चुकीचे असून, त्याबद्दल वर्तमानपत्राने माफी मागावी, अशी मागणी व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव सारा सॅंडर्स यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या वडिलांचे निधन होऊन 20 वर्षे झाली असून, ट्रम्प परिवाराच्या विरोधात अशा प्रकारे आरोप करणे दुर्दैवी आहे, असे सॅंडर्स म्हणाल्या. या वेळी सॅंडर्स यांनी द न्यूयॉर्क टाइम्ससह अमेरिकेतील इतरही काही वर्तमानपत्रांवर दर्जाहीन टीका केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com