प्रेसिडेंट ट्रम्प बिनपगारी काम करणार

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

अमेरिकेच्या अध्यक्षांना दरवर्षी मिळणारे चार लाख अमेरिकी डॉलरचे वेतन न घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. तसेच मी एकही सुट्टी न घेता काम करणार आहे. चार वर्षांच्या कार्यकाळातही मी वेतन घेणार नाही.

न्यूयॉर्क - अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले अब्जाधीश उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतेही वेतन न घेता चार वर्षे अध्यक्षपदाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ट्रम्प यांनी रविवारी एका भाषणादरम्यान हा निर्णय जाहीर केला. सप्टेंबरमध्ये प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी अध्यक्षपद मिळाल्यास वेतन न घेता काम करण्याचे जाहीर केले होते. ट्रम्प यांनी आपण दिलेले हे आश्वासन पूर्ण करत असल्याचे जाहीर केले.

ट्रम्प म्हणाले, की अमेरिकेच्या अध्यक्षांना दरवर्षी मिळणारे चार लाख अमेरिकी डॉलरचे वेतन न घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. तसेच मी एकही सुट्टी न घेता काम करणार आहे. चार वर्षांच्या कार्यकाळातही मी वेतन घेणार नाही. कायद्याने मला कमीत कमी एक डॉलर वेतन घेणे बंधनकारक असल्याने मी वर्षातून एकदा एक डॉलर वेतन म्हणून स्वीकारणार आहे. आपल्याला अनेक कामे करायची आहेत, जी नागरिकांच्या फायद्याची आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याची गरज असून, त्यासाठी मला सुट्टी घेऊन चालणार नाही.

ग्लोबल

वॉशिंग्टन : पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला आहे. अमेरिका आता यावर गप्प बसू शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

10.39 AM

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

रविवार, 20 ऑगस्ट 2017