प्रवेशबंदीच्या नव्या आदेशातून इराकला वगळले

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

बंदी घालण्यात आलेल्या देशांच्या यादीतून इराकला वगळण्यात आले आहे. आता येमेन, सीरिया, इराण, सुदान, लीबिया आणि सोमालिया या मुस्लिम देशांतील नागरिकांना नव्वद दिवसांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

न्यूयॉर्क - प्रवेशबंदीबाबतच्या नव्या आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी स्वाक्षरी केली. नव्या आदेशानुसार, सातऐवजी सहा मुस्लिम देशाषतील नागरिकांना अमेरिकेत तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बंदी घालण्यात आलेल्या देशांच्या यादीतून इराकला वगळण्यात आले आहे. आता येमेन, सीरिया, इराण, सुदान, लीबिया आणि सोमालिया या मुस्लिम देशांतील नागरिकांना नव्वद दिवसांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या सहा देशांतील नागरिकांनी पुढील 90 दिवसांत अमेरिकेत प्रवेशासाठी व्हिसा देण्यात येणार नाही.

ट्रम्प यांनी यापूर्वी सात देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. न्यायालयांनेही ट्रम्प यांच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर आता ट्रम्प प्रशासनाकडून नव्याने अध्यादेश काढण्यात आला आहे.