डूम्सडे क्‍लॉक' 30 सेकंदांनी पुढे 

पीटीआय
शनिवार, 28 जानेवारी 2017

वॉशिंग्टन : जगाचा शेवट कधी होणार, हे प्रतीकात्मकदृष्ट्या सांगणाऱ्या, "डूम्सडे क्‍लॉक' म्हणून ओळख असलेल्या घड्याळाचे काटे शास्त्रज्ञांनी 30 सेकंदांनी पुढे सरकविले आहेत. जगभर मागील वर्षी (2016मध्ये) घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जगाचा शेवट 30 सेकंदांनी जवळ आल्याचे सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून अण्विक शास्त्रज्ञांनी केला आहे. 

सध्या या प्रतीकात्मक घड्याळात रात्रीचे 12 वाजण्यासाठी (घड्याळाचे सर्व काटे शून्यावर येण्यासाठी) दोन मिनिटे आणि 30 सेकंदांचा कालावधी बाकी असल्याचे दर्शविण्यात आले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली निवड, हवामानबदलांमुळे होणारे परिणाम, भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांमध्ये असलेला तणाव आणि उत्तर कोरियाकडून देण्यात आलेली आण्विक हल्ला करण्याची धमकी आदींच्या पाश्वभूमीवर "डूम्सडे क्‍लॉक'मधील वेळ 30 सेकांदांनी कमी करण्यात आल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. 
आण्विक शास्त्रांच्या प्रसिद्ध नियतकालिकातर्फे 1947मध्ये "डूम्सडे क्‍लॉक' या प्रतीकात्मक घड्याळाची निर्मिती केली होती. नैसर्गिक आणि आण्विक हल्ल्यासारख्या मानवनिर्मित आपत्तींच्या तीव्रतेवरून या घड्याळाची वेळ कमी, अधिक केली जाते. 

Web Title: The Doomsday Clock is now 2.5 minutes to midnight, but what does that really mean?