प्रवेशबंदीबाबत नवा आदेश शक्‍य

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन : अमेरिकेतील फेडरल न्यायालयानेही प्रवेशबंदीच्या आदेशाच्या अंमलबजावणीस नकार दिल्याने याबाबत पुढील आठवड्यात "नवा कोरा' आदेश काढून सात मुस्लिम देशांमधील नागरिकांना आणि निर्वासितांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्याचा विचार करत असल्याचे अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या पूर्वीच्या आदेशाला स्थानिक न्यायालयांनी स्थगिती दिल्यानंतर फेडरल न्यायालयानेही प्रवेशबंदीला काल (ता. 10) नकार दिला होता. यानंतर ट्रम्प यांनी या निर्णयाविरोधात लढणार असल्याचे आणि काही तरी मार्ग काढण्याचे जाहीर केले होते. याबाबत आज बोलताना ट्रम्प म्हणाले, ""ही लढाई आम्ही जिंकू. यासाठी निश्‍चितच काही वेळ लागेल. आमच्यासमोर इतरही काही पर्याय उपलब्ध आहेत. प्रवेशबंदीबाबत पुढील आठवड्यात नवा आदेशही काढला जाऊ शकतो.'' नव्या आदेशामध्ये सुरक्षेचे नवे उपायही अंतर्भूत केले असतील, असेही ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकेमध्ये फक्त चांगला उद्देश मनात ठेवून येणाऱ्या लोकांनाच प्रवेश असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.