तुर्कस्तानात सार्वमतामध्ये  एर्दोगान यांचा विजय 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

तुर्कस्तानात घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये विद्यमान अध्यक्ष तय्यीप एर्दोगान यांना निसटता विजय मिळाला आहे. तुर्कस्तानातील पंतप्रधान पद रद्द करून सर्वांधिकार अध्यक्षांकडे बहाल करण्याच्या बाजूने या सार्वमतामधून नागरिकांनी कौल दिला आहे.

इस्तंबूल- तुर्कस्तानात घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये विद्यमान अध्यक्ष तय्यीप एर्दोगान यांना निसटता विजय मिळाला आहे. तुर्कस्तानातील पंतप्रधान पद रद्द करून सर्वांधिकार अध्यक्षांकडे बहाल करण्याच्या बाजूने या सार्वमतामधून नागरिकांनी कौल दिला आहे.

एर्दोगान यांच्या बाजूने 51.4 टक्के मते पडली असली, तरी विरोधकांनी मात्र या निकालाला आव्हान देण्याची घोषणा केली आहे. एर्दोगान हे 2003 पासून तुर्कस्तानात सत्तेवर आहेत. सार्वमतामध्ये विजयी झाल्यामुळे एर्दोगान यांची पकड मजबूत झाली आहे. एर्दोगान यांच्या विरोधात मागील वर्षी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. उठावाचा प्रयत्न असफल ठरल्यानंतर एर्दोगान यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. सार्वमतामध्ये आपल्या बाजूने कौल मिळाल्यानंतर आणीबाणी आणखी नऊ महिन्यांसाठी वाढविण्यात येणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

 

टॅग्स