अणुऊर्जा प्रकल्पातील स्फोटात फ्रान्समध्ये 5 जखमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

निर्माण झालेल्या प्रचंड धुराचा त्रास होऊन पाच जण जखमी झाले. मात्र, यातील कोणी गंभीर नाही.

केन : फ्रान्समध्ये अणुऊर्जा प्रकल्पात आज झालेल्या स्फोटात पाच जण किरकोळ जखमी झाले. मात्र, यामुळे किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

चेरबोर्ग बंदरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या फ्लेमनविली अणुऊर्जा प्रकल्पातील इंजिन रुममध्ये हा स्फोट झाला. मात्र, हा आण्विक अपघात नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

1980 पासून कार्यान्वित असलेल्या या प्रकल्पातील अणू विभागाच्या बाहेर असलेल्या व्हेंन्टिलेटरचा स्फोट झाला. यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुराचा त्रास होऊन पाच जण जखमी झाले. मात्र, यातील कोणी गंभीर नाही. स्फोटानंतर या प्रकल्पातील एक रिऍक्‍टर बंद करण्यात आला आहे.