FBI करतेय ट्रम्प - रशिया संबंधांचा तपास

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

ट्रम्प यांनी दिली हूल

रशियासंबंधी तपासावरून व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांचे आणि रिपब्लिकन नेत्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी ट्रम्प यांनी हे आरोप केले असावेत. मात्र, त्याला पुष्टी देणारे पुरावे मिळाले नसल्याचे FBI ने स्पष्ट केले. 

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी रशियन अधिकाऱ्यांशी खरंच समन्वय साधला का याचा तपास अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (FBI) तपास संस्था करीत आहे. 

अशा तपासांबाबत सहसा माहिती जाहीर केली जात नाही. मात्र, 'या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे माध्यमांचे वृत्त खोटे आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या लोकांनी ही अफवा पसरवली असल्याचा' आरोप ट्रम्प यांनी केला होता. त्यावर FBI चे संचालक जेम्स कॉमी यांनी स्वतःच सोमवारी याबाबत तपास करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. 

पाच तासांच्या घणाघाती सत्रामध्ये FBI च्या संचालकांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे इतर दावेही खोडून काढले. आधीच्या ओबामा प्रशासनाने ट्रम्प यांच्या कार्यालयाची संपर्क यंत्रणेवर हेरगिरी करून नजर ठेवली होती, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. त्यात तथ्य नसल्याचे कॉमी यांनी सांगितले. 
रशियासंबंधी तपासावरून व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांचे आणि रिपब्लिकन नेत्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी ट्रम्प यांनी हे आरोप केले असावेत. मात्र, त्याला पुष्टी देणारे पुरावे मिळाले नसल्याचे FBI ने स्पष्ट केले. 

मागील उन्हाळ्यात सुरू झालेल्या या तपासाबाबतच्या वृत्ताला प्रथमच जाहीररीत्या दुजोरा देण्यात आला. एक सरकारी विभाग दुसऱ्या विभागावर असलेल्या गंभीर आरोपांचा आणि ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणूक प्रचाराचा तपास करीत असताना त्या सुनावणीदरम्यान हा खुलासा झाला आहे. 
या प्रकरणाचा माग जिथपर्यंत निघेल तिथपर्यंत आम्ही पोचू, असे मी तुम्हाला वचन देतो, असे FBI च्या संचालकांनी सांगितले. 
 

Web Title: FBI probing Trump-Russia links, wiretap claims bogus