बेल्जियममध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याची भीती

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

ब्रसेल्स - बेल्जियम देशाची राजधानी असलेल्या ब्रसेल्समध्ये सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेंतर्गत एकास अटक करण्यात आल्यानंतर येथील एका ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

अटक करण्यात आलेल्या नागरिकाने पोलिसांना दुरध्वनी करुन आपल्या अंगावर स्फोटके परिधान केल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्याकडे स्फोटके नसल्याचे पोलिसांचा हवाला देत सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, येथील रस्ते काही काळासाठी बंद करण्यात आले असून घटनास्थळी स्फोटके निकामी करणारे पथक दाखल झाले आहे. "सध्यापुरती परिस्थिती नियंत्रणात असल्या‘चे पंतप्रधान चार्ल्स मायकेल यांनी म्हटले आहे. 

ब्रसेल्स येथे गेल्या मार्च महिन्यामध्ये येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात 32 नागरिक मृत्युमुखी पडले होते. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

पश्‍चिम युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत बेल्जियम हा क्षेत्रफळाने लहान देश आहे. मात्र लोकसंख्या हा निकष विचारात घेता बेल्जियममधून पश्‍चिम आशियात दहशतवादी संघटनांसाठी लढण्यासाठी जाणाऱ्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. बेल्जियममधून आत्तापर्यंत 400 पेक्षाही जास्त तरुण इसिसकडून लढण्यासाठी पश्‍चिम आशियात गेले आहेत.