दहशतवाद्यांना संपवा अथवा हाकलून लावा : मॅटिस

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

वॉशिंग्टन : "पाकिस्तानमध्ये बिनधोकपणे कार्यरत असणाऱ्या दहशतवादी गटांना संपवून टाकावे अथवा हाकलून द्यावे,' असा सज्जड इशारा अमेरिकेचे नियोजित संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकी संसदेच्या लष्करी सेवा समितीसमोर मॅटिस यांनी आपली भूमिका मांडली. त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानबाबतही आपले मत व्यक्त केले.

"पाकिस्तानला अमेरिकेकडून होत असलेली मदत मिश्र स्वरूपाची आहे. मी पदावर आल्यावर सर्व पर्यायांचा विचार करेन. तसेच, अमेरिकेला होणारी मदत आणि प्रादेशिक शांतता याबाबत पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रयत्नांच्या आधारावरच त्यांना आर्थिक मदत देण्याबाबत प्रयत्न करेन. यासाठी पाकिस्तानने त्यांच्या देशात मुक्तपणे वावरणाऱ्या दहशतवादी गटांना संपविणे अथवा हाकलून लावणे आवश्‍यक आहे,' असे मॅटिस यांनी सांगितले. मॅटिस हे अमेरिकेचे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.

अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्यावरून पाकिस्तान काही धडे निश्‍चितच शिकला आहे. त्यांच्या पूर्वीच्या कृतीमुळेच दहशतवादी पाकिस्तानमध्येही हिंसाचार करत आहेत, असे मॅटिस म्हणाले. पाकिस्तानने शेजारी देशांबरोबर सहकार्य करावे आणि तालिबानसह हक्कानी नेटवर्कवर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

ग्लोबल

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017