कॅनडात मशिदीवर गोळीबार; 5 ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

मशिदीचे प्रमुख मोहम्मद यांगुई यांनी या हल्ल्याप्रकरणी दुःख व्यक्त करत हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्यावेळी यांगुई मशिदीत उपस्थित नव्हते.

ओट्टावा - कॅनडातील क्यूबिक शहरातील मशिदीवर दोन अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले असून, काही जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्यूबिक शहरातील इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये असलेल्या या मशिदीत रविवारी रात्री नमाज पठण सुरु असताना दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. यावेळी मशिदीत सुमारे 40 नागरिक होते. या गोळीबारात पाच जण जागीच ठार झाले असून, अनेक जण जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. या मशिदीला यापूर्वीही लक्ष्य करण्यात आले आहे. 

मशिदीचे प्रमुख मोहम्मद यांगुई यांनी या हल्ल्याप्रकरणी दुःख व्यक्त करत हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्यावेळी यांगुई मशिदीत उपस्थित नव्हते. क्यूबिक शहरात मुस्लिमफोबियाचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स