एफएडब्ल्यू-फोक्‍सवॅगनने मोटारी परत बोलाविल्या

यूएनआय
गुरुवार, 18 मे 2017

र्च महिन्यात "फोक्‍सवॅगन'ने सुमारे दहा लाख ऑडी मोटारी कूलंटमधील दोषामुळे परत बोलाविल्या होत्या. गेल्या वर्षी "फोक्‍सवॅगन'ने चीनमध्ये सुमारे 40 लाख मोटारींची विक्री केली असून, जगभरातील एकूण विक्रीत हे प्रमाण दोन पंचमांश आहे

बीजिंग, ता. 17 (यूएनआय) : "फोक्‍सवॅगन' समूहाची चीनमधील संयुक्त कंपनी "एफएडब्ल्यू-फोक्‍सवॅगन'ने ऑटोमोबाईल या 5 लाख 77 हजार 590 मोटारी परत बोलाविल्या आहेत. गोल्फ आणि सॅगिटार या मॉडेलच्या या मोटारी असून, त्यांच्या हेडलाइट फ्यूजमध्ये दोष आढळल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

कंपनीने सप्टेंबर 2009 ते मे 2014 या कालावधीत उत्पादित केलेल्या 4 लाख 16 हजार 364 गोल्फ मोटारी परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जुलै 2010 ते मार्च 2012 या कालावधीत उत्पादित केलेल्या 1 लाख 61 हजार 226 सॅगिटार मोटारी परत बोलाविण्याच्या निर्णय घेतला आहे. या दोन्ही मॉडेलच्या मोटारींच्या हेडलाइट फ्यूजमध्ये दोष आढळला असून, त्यामुळे सुरक्षाविषयक धोका निर्माण होण्याची भीती होती. फ्यूजमधील दोषामुळे हेडलाइट अचानक बंद होण्याचा धोका होता.

"एफएफडब्ल्यू-फोक्‍सवॅगन'मध्ये चीन सरकारचा मोठा हिस्सा आहे. "फोक्‍सवॅगन चायना'ने याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. मार्च महिन्यात "फोक्‍सवॅगन'ने सुमारे दहा लाख ऑडी मोटारी कूलंटमधील दोषामुळे परत बोलाविल्या होत्या. गेल्या वर्षी "फोक्‍सवॅगन'ने चीनमध्ये सुमारे 40 लाख मोटारींची विक्री केली असून, जगभरातील एकूण विक्रीत हे प्रमाण दोन पंचमांश आहे.