भारताची ब्रिटनमधील गुंतवणूक घटली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

लंडन - भारताची ब्रिटनमधील गुंतवणूक घटली असल्याचे चित्र आहे. ब्रिटनमधील परकी गुंतवणूक करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताची एका स्थानाने घसरण होऊन आता चौथ्या स्थानावर पोचला आहे. भारताचे ब्रिटनमध्ये 127 नवे प्रकल्प असून एकूण 7,645 रोजगार निर्मिती केली आहे. तसेच 2016-17 या वर्षामध्ये 3,999 अधिक रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

ब्रिटनमधील गुंतवणूक करणाऱ्या देशामध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर असून अमेरिकेचे ब्रिटनमध्ये 577 प्रकल्प आहेत. त्यानंतर चीनचा (हॉंगकॉंग) दुसरा क्रमांक लागतो. चीनचे ब्रिटनमध्ये 160 प्रकल्प आहेत. फ्रान्स या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. फ्रान्सचे ब्रिटनमध्ये 131 प्रकल्प आहेत. भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचेही ब्रिटनमध्ये 127 प्रकल्प आहेत.