रेनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्संना डूडलद्वारे मानवंदना

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - रोनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्स मॅकिन्टॉशची आज (गुरुवार) 250वी जयंती. त्यानिमित्त गुगलने त्यांना खास गुगल डुडलद्वारे मानवंदना दिली.

गुगल उघडल्यावर पावसात रेनकोट घालून भिजणारी एक व्यक्ती आज दिसत आहे. हीच ती रेनकोटचा शोध लावणारी व्यक्ती. 

चार्ल्स त्यांचा जन्म स्कॉटलंडमधल्या ग्लासगोव्हमध्ये झाला. चार्ल्स यांना रसायनशास्त्रात रुची होती. नाफ्ता नावाचा पदार्थ हा रबरमध्ये सहज विरघळतो. यापासून तयार होणारा पदार्थ जलरोधक असतो. चार्ल्स त्यांनी दोन कपड्यांच्यामध्ये हे मिश्रण लावले हा कपडा पाण्यात भिजला तरी त्यातून पाणी आत झिरपणार नाही याचा शोध चार्ल्स यांनी लावला. त्यानंतर 1823मध्ये त्यांनी जलरोधक कापड बनवण्याचे पेटंट मिळाले. 

पावसात स्कॉटीश नागरिकांचे फिरताना हाल व्हायचे. त्याकाळचे जलरोधक कपड्यांचे वजन जास्त असायचे, शिवाय त्याला कुबट वासही येत असे. त्यामुळे चार्ल्स यांचा हा शोध खूपच महत्त्वाचा ठरला. चार्ल्सने शोधलेल्या रेनकोटला प्रसिद्धीही लाभली.