गुगलच्या साह्याने बनवा तुमचे संकेतस्थळ

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

सद्यःस्थितीला अनेक लघू उद्योजक क्षमता असूनही पुरेसा व्यवसाय करू शकत नाहीत किंवा पैसा कमवू शकत नाहीत, परंतु त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते त्याचे सोने करू शकतात. ऑनलाइनच्या माध्यमातून अशा उद्योजकांना सुवर्णसंधीची दारेच खुली होणार असल्याने या योजना फार महत्त्वाच्या ठरणार आहेत.

 

नवी दिल्ली - भारतातील लघू उद्योग आणि मध्यम उद्योगांना चालना मिळावी म्हणून गुगलचे मुख्याधिकारी सुंदर पिचाई यांनी डिजिटल अनलॉक आणि माय बिजनेस वेबसाइट या दोन योजनांची घोषणा केली आहे. भारतामधील लघू उद्योजकांमध्ये भरपूर क्षमता असून, त्यांनी जर तंत्रज्ञानाचे साह्य घेतले, तर त्यांची आर्थिक भरभराट होऊ शकते. त्याकरिता गुगल लघू उद्योजकांसाठी डिजिटल अनलॉक आणि माय वेबसाइट या दोन योजना राबविणार असून, यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षणही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सद्यःस्थितीला अनेक लघू उद्योजक क्षमता असूनही पुरेसा व्यवसाय करू शकत नाहीत किंवा पैसा कमवू शकत नाहीत, परंतु त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते त्याचे सोने करू शकतात. ऑनलाइनच्या माध्यमातून अशा उद्योजकांना सुवर्णसंधीची दारेच खुली होणार असल्याने या योजना फार महत्त्वाच्या ठरणार आहेत. डिजिटल अनलॉक अंतर्गत इंटरनेटचा वापर करून आपला व्यापार जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचावा यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. देशातील 40 शहरांमध्ये या कार्यशाळा होणार असल्याची माहिती सुंदर पिचाई यांनी लघू उद्योगांसाठी आयोजित मेळाव्यामध्ये दिली.

त्याचप्रमाणे "माय बिजनेस वेबसाइट' या कार्यक्रमातून प्रत्येक छोट्या व्यापाऱ्यालादेखील गुगलद्वारे आपली स्वतंत्र वेबसाइट तयार करता येऊ शकेल, असे पिचईंनी म्हटले आहे. संकेतस्थळ बनवणे आणि ते सांभाळणे या दोन्ही गोष्टी अतिशय क्‍लिष्ट असल्याने व्यापाऱ्यांना सोईस्कर अशी संकेतस्थळे गुगल बनवणार आहे. ही संकेतस्थळे मोबाईलद्वारेसुद्धा चालवली जाऊ शकतील.

Web Title: Google Unveils My Business Websites Service for Indian SMBs