म्यानमार: रोहिंग्यांनी 28 हिंदुंची केली क्रूर हत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

या हिंदुंना येथील आराकान रोहिंग्या मुक्ती सेनेने (एआरएसए) या दहशतवादी संघटनेने अत्यंत क्रूरपणे ठार केल्याची माहिती सैन्याकडून देण्यात आली आहे. या संघटनेच्या पोलिस चौक्‍यांवरील हल्ल्यांमुळे संतप्त सैन्याने केलेल्या कारवाईमध्ये सुमारे साडेचार लाख रोहिंग्या मुस्लिम विस्थापित झाले आहेत

न्येपिदाव्ह - रोहिंग्या दहशतवाद्यांनी ठार केलेल्या किमान 28 हिंदुंची सामूहिक स्मशानभूमी म्यानमारमधील राखिन प्रांतात आढळून आल्याची माहिती म्यानमारच्या सैन्याने दिली आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यापासून राखिन प्रांतात भडकलेल्या जातीय हिंसाचाराच्या वणव्यामध्ये लक्ष्य करण्यात आल्यामुळे येथील हजारो हिंदुंनी प्राणभयाने स्थलांतर केले आहे. या हिंदुंना येथील आराकान रोहिंग्या मुक्ती सेनेने (एआरएसए) या दहशतवादी संघटनेने अत्यंत क्रूरपणे ठार केल्याची माहिती सैन्याकडून देण्यात आली आहे. या संघटनेच्या पोलिस चौक्‍यांवरील हल्ल्यांमुळे संतप्त सैन्याने केलेल्या कारवाईमध्ये सुमारे साडेचार लाख रोहिंग्या मुस्लिम विस्थापित झाले आहेत.

याचबरोबर, या हिंसाचारात या भागात राहत असलेले सुमारे 30 हजार हिंदु व बौद्ध नागरिकही विस्थापित झाले आहेत. या हिंसाचाराचे आंतररष्ट्रीय पातळीवरही गंभीर पडसाद उमटले आहेत.