शिकारी कुत्रा साडेसात कोटीचा

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

डब्लिन (आयर्लंड) - येथील पोलिसांनी एका शिकारी कुत्र्याचे अपहरण केल्या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळ मिळालेल्या 'ग्रेहाऊंड' जातीच्या या कुत्र्याचे 'क्लेअर्स रॉकेट' असे नाव असून, तो सुखरुप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या कुत्र्याची किंमत दहा लाख यूरो म्हणजे जवळजवळ साडेसात कोटी येवढी आहे.

क्लेअर्स रॉकेटचे टिपरेरी काउंटी येथून अपहरण झाले होते. ग्रेहाऊंड रेसिंगमधला हा कुत्रा सुपरस्टार असल्याचे मानले जाते. त्यामुळे क्लेअर्स रॉकेटला येवढी किंमत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कोवळ दोन वर्षाच्या या कुत्र्यावर 54 हजार युरोचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे.

'द रेसिंग पोस्ट'नी दिलेल्या माहितीनुसार, क्लेअर्स हा गेल्या काही वर्षातील सर्वात वेगवान आणि चांगल्या जातीचा कुत्रा आहे. टिपरेरी काउंटीमधील ग्राहम हॉलॅंडमध्ये त्याचे प्रशिक्षण झाले आहे. 

ग्रेहाऊंड जातीच्या कुत्र्यांचे वेशिष्ट्य म्हणजे ही शिकारी कुत्री असतात. बचाव कार्यासाठी देखील या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जाते. वेगाने पळण्यात ही कुत्री माहिर असतात. या जातीच्या कुत्र्यांची लोकप्रियता सध्या वाढते आहे.