माझ्या प्रवासावर निर्बंध नकोत: हफीझ सईद

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

जमात उद दवाचा दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग नसून माझ्यापासून सरकारला कोणताही सुरक्षाविषयक धोका नसल्याचा दावाही सईद याने केला आहे

इस्लामाबाद - जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या व मुंबई येथील दहशतवादी हल्ल्याचा (2008) कुख्यात "मास्टरमाईंड' हफीझ सईद याने पाकिस्तानमधील सरकारने त्याच्यावर घातलेले प्रवासासंदर्भातील निर्बंध उठविण्याची मागणी केली आहे.

या निर्बंधांनुसार सईद याला परदेशांत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जमात उद दवाचा दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग नसून माझ्यापासून सरकारला कोणताही सुरक्षाविषयक धोका नसल्याचा दावाही सईद याने केला आहे. पाकिस्तानने गेल्या महिन्यात सईद, त्याची फलाह-इ-इन्सानियत ही धर्मादाय संस्था व जमात उद दवाशी संबंधित असणाऱ्या इतर 37 जणांवर निर्बंध लादले आहेत. याचबरोबर, सईद व संघटनेच्या इतर चार नेत्यांना तीन महिन्यांसाठी नजर कैदेमध्येही ठेवण्यात आले आहे.

मात्र आपला दहशतवादाशी संबंध नसून प्रांतीय वा स्थानिक न्यायालयांमध्ये यासंदर्भातील कुठलाही पुरावा सादर करण्यात आला नसल्याचा दावा सईद याच्याकडून करण्यात आला आहे.

ग्लोबल

ऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल सॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून,...

09.03 PM

जेद्दाह - सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दाह येथील रस्त्यावर एका लोकप्रिय...

01.36 PM

लंडन : भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्तांना ब्रिटिश सरकारने आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे....

10.42 AM