चौकशीचा निर्णय त्रासदायक : हिलरी

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

फ्लोरिडामधील एका प्रचारसभेत हिलरी म्हणाल्या,""निवडणुकीच्या तोंडावर हे चौकशीचे प्रकरण उकरून काढणे अकल्पित आहे. मतदारांना या प्रकरणाची पूर्ण माहिती देणे आवश्‍यक असून, संचालक कॉमी यांनी तातडीने ही माहिती जाहीर करावी.''

वॉशिंग्टन -  निवडणूक दहा दिवसांवर आली असताना ई मेल प्रकरणाचा फेरतपास करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी आज अमेरिकेची तपास संस्था "एफबीआय'चे संचालक जेम्स कॉमी यांच्यावर टीकेची झोड उठविली. "एफबीआय'चा हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आणि प्रचंड त्रासदायक असल्याचे हिलरी यांनी म्हटले आहे.

फ्लोरिडामधील एका प्रचारसभेत हिलरी म्हणाल्या,""निवडणुकीच्या तोंडावर हे चौकशीचे प्रकरण उकरून काढणे अकल्पित आहे. मतदारांना या प्रकरणाची पूर्ण माहिती देणे आवश्‍यक असून, संचालक कॉमी यांनी तातडीने ही माहिती जाहीर करावी.''

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी आठ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्यावर झालेल्या विविध आरोपांमुळे हिलरी यांचे पारडे जड झाल्यासारखे वाटत होते. असे असतानाच हिलरी यांच्या ई मेल प्रकरणाची चौकशी सुरू होण्याच्या निर्णयाचा फटका त्यांच्या मतांवर पडू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 2009 ते 2012 या काळात परराष्ट्रमंत्री असताना हिलरी यांनी काही गुंतवणूकदारांना खासगी सर्व्हर आणि ई मेलचा वापर करत संपर्क साधला होता. यावरून त्यांनी गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी काही महिन्यांपूर्वीच थंडावली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच "एफबीआय'ने हिलरी यांना पत्र पाठवत चौकशी सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.
 

Web Title: hillary clinton criticizes fbi director